छ. संभाजीनगर - भाजपा मध्य विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
छत्रपती संभाजीनगर, 20 जून, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी मध्य विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची SIR (Special Intensive Revision) अभियानाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार डॉक्टर भागवत कराड
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 जून, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी मध्य विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची SIR (Special Intensive Revision) अभियानाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांची यावेळ उपस्थिती होती. बैठकीमध्ये मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. तसेच अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे व वगळणे यासह विविध बाबींवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रत्येक बूथ स्तरावर संघटनात्मक बळकटीकरण, नागरिकांपर्यंत पोहोचून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तसेच आगामी काळातील नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीस मध्य विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande