लातूरमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
लातूर, 20 जून (हिं.स.) : माजी पालकमंत्री तथा भाजप नेते आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळातून स्
आमदार संभाजी पाटील निलंगेकर


लातूर, 20 जून (हिं.स.) : माजी पालकमंत्री तथा भाजप नेते आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत करण्यात आले आहे.

हा उपक्रम नगरसेविका स्वाती घोरपडे-जवळगे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या लोकसेवेच्या वारशाला अभिवादन करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला नगरसेवक रविशंकर जाधव, व्यावसायिक सुनिल भोसले, मुख्याध्यापिका जे. व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक गुरमे सर, पर्यवेक्षिका झिरमिरे मॅडम, तसेच प्रवीण घोरपडे सर, काटे सर, कोथिंबिरे सर, सौ. पाचंगे मॅडम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक अशोक तोगरे सर यांनी केले. प्रारंभी सर्व मान्यवरांचा शाळेतील शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, समाजोपयोगी व शिक्षणाला चालना देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande