चाऱ्याअभावी मेंढपाळांची भटकंती, वेरुळ घाटात मुलांसह तारेवरची कसरत
छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)। जून महिना सुरू होऊनही पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका मेंढपाळ समाजाला बसत असून जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. खुलताबाद
चाऱ्याअभावी मेंढपाळांची भटकंती, वेरुळ घाटात मुलांसह तारेवरची कसरत


छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)।

जून महिना सुरू होऊनही पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका मेंढपाळ समाजाला बसत असून जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. खुलताबाद व परिसरातील जंगल भागात हिरवा चारा उपलब्ध नसल्याने मेंढपाळांना आपल्या कुटुंबासह आणि कळपासह एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतर करावे लागत आहे. वेरुळ घाट परिसरात लहान मुलांना सोबत घेऊन भर उन्हात प्रवास करताना त्यांची मोठी कसरत होत आहे. पावसाअभावी जनावरे वाचविण्यासाठी मेंढपाळांची सुरू असलेली ही धडपड चिंतेचा विषय ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande