परिस्थिती गंभीर पाऊस गायब, बळीराजा चिंताग्रस्त
बीड, 20 जून (हिं.स.)। जून महिना अर्धा संपून गेला तरी नेकनूर आणि परिसरामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याने येथील परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. कडक ऊन आणि कोरड्या हवामानामुळे शेतकरी वर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. दरवर्षी या दिवसांत शेतात
परिस्थिती गंभीर पाऊस गायब, बळीराजा चिंताग्रस्त


बीड, 20 जून (हिं.स.)।

जून महिना अर्धा संपून गेला तरी नेकनूर आणि परिसरामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याने येथील परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. कडक ऊन आणि कोरड्या हवामानामुळे शेतकरी वर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. दरवर्षी या दिवसांत शेतात पेरण्यांची लगबग असायची, मात्र यंदा शेतकरी राजा चातकासारखा आभाळाकडे डोळे लावून बसला असून ढग कधी फुटणार? आणि कोरड्या जमिनीची तहान कधी मिटणार, या एकाच प्रतीक्षेत आहे.

बहुतांश शेतकऱ्यांनी

पावसाच्या आशेने खते आणि बियाण्यांची खरेदी करून ठेवली आहे. काही भागांत धूळपेरणी झाली खरी, पण पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे ते बियाणे मातीतच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, ते कसेबसे पिके 'जगवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोरवेल) पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुरुवातीला पडलेल्या तुरळक पावसावर ज्यांनी पेरणी केली, त्यांच्यावर आता दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. पाऊस नसल्याने नवीन चारा उगवलेला नाही, त्यामुळे जनावरांना

कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना घाईगडबडीत पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत किमान ७५ ते १०० मिमी दमदार पाऊस होत नाही आणि जमिनीत पुरेशी ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरण्या करू नयेत, जेणेकरून बियाणे वाया जाणार नाही आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळेल.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande