परभणीत मंदिराचा गाभारा कोसळून काही भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी
परभणी, 20 जून (हिं.स.) : परभणी ते मानवत या रस्त्यावरील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील मंदिराचा गाभारा कोसळून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत काही भाविक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसा
अ


परभणी, 20 जून (हिं.स.) : परभणी ते मानवत या रस्त्यावरील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील मंदिराचा गाभारा कोसळून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत काही भाविक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू होते. या बांधकामात दगडांचा वापर करण्यात येत होता. शनिवारी (20 जून) दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली असताना गाभाऱ्याचा काही भाग, विशेषतः दगडाचा भाग अचानक कोसळला.

या दुर्घटनेत काही भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांची संख्या चार किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून बचावकार्य सुरू असल्याचे समजते. मात्र, मृत व जखमींची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्रशासनाकडून पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande