
परभणी, 20 जून (हिं.स.)।
परभणी जिल्ह्याचे भूमीपुत्र सौमित्र धारासूरकर याने संकलित (एडीट) केलेला व डॉ. रसिक कदम निर्मित व प्रितम पाटील दिग्दर्शीत घबाड-कुंड' हा मराठीतलं पहिलं युनिव्हर्स चित्रपट परभणीतील अनुसया मल्टिप्लेक्स मध्ये मान्यवरांसह शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत प्रदर्शित झाला.
त्यानिमित्त छोटेखानी शुभारंभाच्या कार्यक्रमास महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, लक्ष्मी शुगर्स एनर्जी प्रकल्पाचे संचालक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅड न.चि जाधव, भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, जलमित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव आजेगावकर,प्रसिद्ध नाट्य कलावंत सर्वश्री किशोर पूराणिक यांच्यासह अन्य नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच नाट्य क्षेत्रातील कलावंत आवर्जून उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis