
नागपूर, 20 जून (हिं.स.) : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे जागतिक उद्योगांचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, युनिव्हर्सिटीजनी विद्यार्थ्यांना केवळ पहिल्या नोकरीसाठी नव्हे तर संपूर्ण करिअर प्रवासासाठी तयार करणे आवश्यक आहे, असे मत वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (WPU) गोवाच्या नागपूर येथे आयोजित ओपन हाऊस कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमात भावी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उच्च शिक्षणाचे बदलते स्वरूप आणि भविष्यातील अपेक्षा यावर सखोल चर्चा करण्यात आली.कार्यक्रमात डब्ल्यूपीयू गोवाच्या ट्रान्सडिसिप्लिनरी (आंतरशाखीय) शैक्षणिक मॉडेलवर विशेष भर देण्यात आला. या मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना एका विषयाच्या मर्यादेपलीकडे जाऊन विविध क्षेत्रांचा समन्वय साधण्याची क्षमता, अनुकूलता आणि वास्तव जीवनातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्याचा उद्देश आहे.
विद्यापीठ अधिकाऱ्यांचे मत
व्हाईस चान्सलर प्रो. वॉल्टर लील यांनी सांगितले की, विद्यापीठाचा उद्देश विद्यार्थ्यांना आयुष्यभर शिकणारे, बदल स्वीकारणारे आणि नेतृत्वक्षम बनवणे आहे.प्रो-व्हाईस चान्सलर डॉ. आशिष भारद्वाज यांनी स्पष्ट केले की, “विद्यार्थ्यांना फक्त पहिल्या नोकरीसाठी तयार करणे पुरेसे नाही. खरी गरज म्हणजे त्यांना सतत बदलणाऱ्या करिअर परिस्थितींना सामोरे जाण्यास सक्षम बनवणे आहे. चर्चेत असेही नमूद करण्यात आले की, उद्योग क्षेत्र शिक्षणापेक्षा अधिक वेगाने बदलत आहे. नवीन व्यवसाय निर्माण होत आहेत, तर पारंपारिक भूमिका बदलत आहेत. त्यामुळे बहुविषयक कौशल्य असलेल्या व्यक्तींना अधिक मागणी वाढत आहे.
भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये
तंत्रज्ञान कौशल्यांबरोबरच शिकण्याची वृत्ती, अनुकूलता, जिज्ञासा आणि आजीवन शिक्षण ही भविष्यातील करिअरसाठी अत्यावश्यक कौशल्ये असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. डब्ल्यूपीयू गोवा येथे सध्या बी.टेक (सीएसई), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ऑनर्स), बी.डेस (प्रॉडक्ट डिझाइन), बी.डेस (कम्युनिकेशन डिझाइन) आणि बी.एस्सी (ऑनर्स) इन सायकॉलॉजी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या चर्चेत उच्च शिक्षण संस्थांनी केवळ रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांना भविष्यातील अनिश्चित आणि बदलत्या जगासाठी सक्षम बनवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी