पुण्यात पाणीटंचाईचे संकट गडद; टँकर दरांवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा होणार
पुणे, 20 जून (हिं.स.)खडकवासला धरण प्रकल्पातील घटता पाणीसाठा आणि खासगी टँकरच्या वाढत्या दरांमुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. या पार्श्वभूमीवर पाणीसाठा आणि टँकर दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची
Dam


पुणे, 20 जून (हिं.स.)खडकवासला धरण प्रकल्पातील घटता पाणीसाठा आणि खासगी टँकरच्या वाढत्या दरांमुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. या पार्श्वभूमीवर पाणीसाठा आणि टँकर दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.

महापौर नागपुरे म्हणाल्या की, गेल्या वर्षी याच कालावधीत खडकवासला धरण प्रकल्पात सुमारे ७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यंदा तो केवळ ४ टीएमसीवर आला आहे. टंचाईच्या परिस्थितीचा फायदा घेत काही खासगी टँकरचालकांनी दर वाढवले असून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पाणी कपातीनंतर शहरात पाणीपुरवठ्याबाबत तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत सुमारे ४३७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेकडून यापूर्वी दररोज १ हजार ४५० टँकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, वाढत्या मागणीमुळे हा आकडा १ हजार ६६५ फेऱ्यांपर्यंत पोहोचला असून अवघ्या चार दिवसांत टँकरची मागणी २१५ ने वाढली आहे.

धरणातील घटता पाणीसाठा लक्षात घेता शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभाग घेणार आहे. पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. शेतीसाठी किती पाणी उपलब्ध करून द्यायचे, याचा अंतिम निर्णय संबंधित विभागाकडून घेतला जाणार आहे.खासगी टँकरच्या वाढत्या दरांबाबत अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने काही प्रमाणात दरवाढ होणे स्वाभाविक असल्याचे महापौरांनी सांगितले. मात्र, दर दोन ते तीनपट वाढविणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टँकरचालक, प्रशासन आणि संबंधित घटकांची बैठक घेऊन टँकर दरांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande