
छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा यांच्या वतीने आयोजित नियुक्ती पत्र वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटन विस्तार, समाजहिताची बांधिलकी आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रसार यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्षाच्या सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला बळकटी देत अनुसूचित जाती समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहचविण्यासाठी नव्या जबाबदाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मोदी सरकारच्या गरीब, वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis