
नांदेड, 20 जून (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत विविध भागांतील नागरिकांनी आपल्या नागरी समस्या व अडचणी मांडण्यासाठी महापौर मुळे यांची भेट घेतली. यावेळी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती व बांधकाम तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या आणि अपेक्षा व्यक्त केल्या.
कविता संतोष मुळे, महापौर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, यांनी सर्व नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
जनतेच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे हेच माझे कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाच्या समस्येवर सकारात्मक आणि जलद तोडगा निघावा यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. असे त्यांनी सांगितले
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis