हार्दिक इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार, विराटचा सहभाग फिटनेस चाचणीवर अवलंबून
नवी दिल्ली, 20 जून (हिं.स.)भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, या दौऱ्यासंदर्भ
हार्दिक पांड्या


विराट कोहली


नवी दिल्ली, 20 जून (हिं.स.)भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, या दौऱ्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. तर विराट कोहलीची फिटनेस चाचणी होणार आहे. आणि त्या आधारावर पुढील निर्णय घेतले जातील. भारत आणि इंग्लंड १ जुलैपूर्वी पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिका १४ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये सुरू होईल, तर मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे.

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी पंड्या बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करत होता, तेव्हा त्याच्या मांडीला दुखापत झाली. त्याने तात्काळ वैद्यकीय पथकाला या घटनेबद्दल माहिती दिली. पंड्याची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अफगाणिस्तान मालिकेतून वगळण्यात आले. तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तंदुरुस्त होईल अशी आशा होती. मात्र, तसे झाले नाही आणि तो या मालिकेतही खेळणार नाही.

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात कोहलीला दुखापत झाली होती आणि तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेबाहेर आहे. कोहली सध्या लंडनमध्ये असून, तेथे सीओईची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. कोहलीसाठी एक पुनर्वसन कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, ज्याचे तो पालन करत असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याची फिटनेस चाचणी लंडनमध्येच होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande