
परभणी, 21 जून (हिं.स.) राष्ट्रीय परीक्षा संस्था मार्फत आयोजित करण्यात येणारी पुनर्नीट (RE-NEET-UG) 2026 परीक्षा रविवार (दि.21) दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत परभणीतील 14 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 4 हजार 751 परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते, यापैकी 4 हजार 370 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून 381 विद्यार्थी गैरहजर राहिले.परीक्षा केंद्रनिहाय एकूण पैकी उपस्थित व गैरहजर (कंसात) परीक्षार्थीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. डी एस एम कॉलेज 600 पैकी 553 उपस्थित (47 गैरहजर), जिजाऊ ज्ञानतीर्थ ज्युनिअर कॉलेज 600 पैकी 552 उपस्थित (48), कृषी महाविद्यालय 480 पैकी 447 उपस्थित (33),शिवाजी ज्युनिअर कॉलेज 480 पैकी 441 उपस्थित (39), कै.रावसाहेब जामकर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय 360 पैकी 327 उपस्थित (33), बालविद्या मंदिर हायस्कूल 288 पैकी 270 उपस्थित (18), गांधी विद्यालय हायस्कूल 264 पैकी 248 उपस्थित (16), भारतीय बालविद्या मंदिर हायस्कूल 240 पैकी 216 उपस्थित (24), पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय 240 पैकी 225 उपस्थित (15), संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय 240 पैकी 220 उपस्थित (20), सारंग स्वामी विद्यालय 240 पैकी 219 उपस्थित (21), शारदा माध्यमिक विद्यालय 240 पैकी 220 उपस्थित (20), शारदा कला व विज्ञान महाविद्यालय 240 पैकी 215 उपस्थित (25), श्री शिवाजी लॉ कॉलेज, परभणी 239 पैकी 217 उपस्थित (22).
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis