अमरावतीत दोन गटांत गोळीबार; तिघे ताब्यात
अमरावती, 21 जून (हिं.स.)। शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास असोरिया पेट्रोल पंपासमोर दोन गटात गोळीबार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलीस आयुक्तांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला आणि तत्काळ तिघांना ताब्यात घेत
अमरावतीत दोन गटांत गोळीबार; तिघे ताब्यात


अमरावती, 21 जून (हिं.स.)। शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास असोरिया पेट्रोल पंपासमोर दोन गटात गोळीबार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलीस आयुक्तांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला आणि तत्काळ तिघांना ताब्यात घेतले. शोएब असे जखमीचे तर अरबाज, तौसिफ आणि सोफियान अशी अटकेतील हल्लेखोरांची नावे आहेत.

ऐफाज व नासीर घोड यांच्यात मागिल काही वर्षापासून वाद आहे. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ऐफाज व त्याचा भाऊ शोएब असोरिया पेट्रोल पंपासमोर उभे होते. तेव्हा हल्लेखोर आले आणि त्यांच्यात वाद झाला. यावेळी नासीर घोड याच्यासोबत आलेल्या युवकांनी हवेत गोळीबार करुन दोघांवर घातक शस्त्राने हल्ला चढवीला. यामध्ये शोएब गंभीर जखमी झाला गोळीबार झाल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि संपूर्ण परिसराची पाहणी करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande