आंतरराष्ट्रीय योग दिन सामूहिक प्रात्यक्षिकांनी साजरा
अकोला, 21 जून (हिं.स.)। जिल्हा प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील दीक्षांत समारंभ सभागृहात योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, जेष्ठ नागरिक, महिला, युवक विद्या
Photo


अकोला, 21 जून (हिं.स.)।

जिल्हा प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील दीक्षांत समारंभ सभागृहात योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, जेष्ठ नागरिक, महिला, युवक विद्यार्थी आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामूहिक योग प्रात्यक्षिकातून योग दिन साजरा केला.

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, मेरा युवा भारत केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, शिक्षण विभाग, पोलीस प्रशिक्षण केंद्र, एन.सी.सी., स्काऊट गाईड, होमगार्ड, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, योग भारती, क्रीडा भारती, अकोला योग परिषद, विविध सामाजिक संस्था तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande