
अकोला, 21 जून (हिं.स.)।
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शासनाच्या सुचनेनुसार तसेच मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये आज दि.21 जून 2026 रोजी सकाळी अकोला महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे योग गुरू अशोक पांडे यांच्या मार्गदर्शनात योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
योगशास्त्र ही भारतीयांची संपुर्ण जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, थायराईड वृध्दी, मनोविकार, सांध्यांचे विकार तसेच सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार योग करण्यामुळे कमी किंवा संपुर्णपणे बरे होवू शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास व रोगमुक्त होण्यामध्ये मदत होते. तसेच सकारात्मक उर्जा मिळते म्हणून शहरातील नागरिकांनी निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी योग करावे असे आवाहन यावेळी अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा करण्यात आले आहे.
यावेळी मनपा उपायुक्त दिलीप जाधव, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, कर अधिक्षक नंदीनी दामोदर, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, समाज कल्याण व विकास विभागाचे विभाग प्रमुख रंजना आंधळे, भांडार विभाग प्रमुख संतोष नायडू, एन.यू.एल.एम. विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर, गणेश बिल्लेवार, सहा.अतिक्रमण निर्मुलन अधिकारी प्रवीण मिश्रा, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता नरेश बावणे यांचेसह ईतर कर्मचा-यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे