
अकोला, 21 जून (हिं.स.)।
योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी, तणावरहित आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी योगाचा अंगीकार करणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले.ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) मुख्यालयात आयोजित योग दिन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. एस. एस. गरकल,महाव्यवस्थापक (विपणन)व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाकरे,श्री प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुणी,श्री.यादव महा व्यवस्थापक वित्त यांच्यासह महाबीज मुख्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. स्वामी म्हणाले की, नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, तसेच कामकाजातील कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढते,
महाराष्ट्र योगशिक्षक संघ अमरावती विभाग प्रमुख डॉ.चंद्रकांत अवचार,अर्चना काठोडे, नरेंद्र मुळे,योगशिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. उल्हास मोकळकर व योगा क्वीन सदस्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करण्यात आली.
उपस्थिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संदेश दिला.या उपक्रमात योग दिनाच्या माध्यमातून आरोग्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच नियमित योगाभ्यासाचा संकल्प उपस्थितांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे