चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार
चंद्रपूर, 21 जून (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, खेलो इंडिया, शिक्षण विभाग आणि पंतजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्हा क्रीडा
चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार


चंद्रपूर, 21 जून (हिं.स.)।

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार आला.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, खेलो इंडिया, शिक्षण विभाग आणि पंतजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, शिक्षणाधिकारी (प्राथ) अश्विनी सोनवणे यांच्यासह पतंजली योग समितीचे सदस्य उपस्थित होते.

जागतिक योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणारी ज्योती देऊरकर, मिशन लक्षवेध मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेलो इंडियाचे अंकिता चव्हाण आणि सोहम मोरे या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande