
चंद्रपूर, 21 जून (हिं.स.)आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जलतरण तलावातही योगासने करण्यात आलीत.जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, खेलो इंडिया, शिक्षण विभाग आणि पंतजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, शिक्षणाधिकारी (प्राथ) अश्विनी सोनवणे यांच्यासह पतंजली योग समितीचे सदस्य उपस्थित होते.मुख्य शासकीय कार्यक्रमापूर्वी जिल्हा क्रीडा संकूल येथील जलतरण तलावात ८९ वर्षीय कृष्णाजी नागपूरे यांच्यासह सूवर्णा नागपुरे कामडे, संजीव कुमार जयपुरकर आणि प्रदीप मोहनापुरे यांनी ‘वॉटर योगा’ करून उपस्थितांची मने जिंकली.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव