फिफा विश्वचषक २०२६ : इक्वेडोरला गोलशून्य बरोबरीत रोखत कुरासाओला पहिला विश्वचषक गुण
मिसूरी (अमेरिका), 21 जून (हिं.स.)कॅन्सस सिटी येथे झालेल्या ''गट ई''मधील सामन्यात कुरासाओविरुद्ध ०-० अशी निराशाजनक बरोबरी साधल्यामुळे फिफा विश्वचषक २०२६ च्या बाद फेरीत पोहोचण्याच्या इक्वेडोरच्या आशांना धक्का बसला. कुरासाओचा गोलकीपर एलॉय रूम याने
कुरासाओचा फुटबॉल संघ


मिसूरी (अमेरिका), 21 जून (हिं.स.)कॅन्सस सिटी येथे झालेल्या 'गट ई'मधील सामन्यात कुरासाओविरुद्ध ०-० अशी निराशाजनक बरोबरी साधल्यामुळे फिफा विश्वचषक २०२६ च्या बाद फेरीत पोहोचण्याच्या इक्वेडोरच्या आशांना धक्का बसला. कुरासाओचा गोलकीपर एलॉय रूम याने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या देशाला विश्वचषकातील पहिला गुण मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात इक्वेडोरचे चेंडूवरील वर्चस्व होते आणि त्यांनी अनेक संधी निर्माण केला. पण रूमने अप्रतिम बचाव करत त्यांना वारंवार रोखले. त्याची ही कामगिरी स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम ठरली आहे.

सामन्याच्या सुरुवातीलाच, अवघ्या तीन मिनिटांत कर्णधार एनर व्हॅलेन्सियाने एका लांब पासवर वेगवान चाल केली, पण रूमने शानदार बचाव करत त्याला रोखले. याला प्रत्युत्तर म्हणून कुरासाओनेही एक दुर्मिळ आक्रमण केले, ज्यात शेरेल फ्लोरानसचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला. पण पहिल्या सत्रातील उर्वरित वेळ प्रामुख्याने इक्वेडोरच्या वर्चस्वाखाली गेला. जॉन येबोआने वेगवान मुसंडी मारत रूमची परीक्षा घेतली, तर पेड्रो विटेचा पेनाल्टी क्षेत्राच्या कडेवरून मारलेला एक शॉर्ट थोडक्यात बाहेर गेला. व्हॅलेन्सियाला पुन्हा एकदा जवळून गोल करण्यापासून रोखण्यात आले, तर त्यानंतर गोन्झालो प्लाटा आणि येबोआ यांच्या फटक्यांवरही कुरासाओच्या गोलकीपरला बचाव करावा लागला. दुसरीकडे, इक्वेडोरचा गोलकीपर हर्नान गॅलिंडेझ याला फारसे आव्हान मिळाले नाही

मध्यंतरानंतरही हेच चित्र कायम राहिले आणि इक्वेडोरने गोल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मोईसेस कैसिडोने दुरून प्रयत्न केला, तर प्लाटाचा फटका आणि जवळून मारलेला हेडर रूमने उत्कृष्टरीत्या अडवला. बराच काळ दबावाखाली असूनही, कुरासाओने प्रति-आक्रमणाद्वारे धोकादायक खेळ केला. लिआंड्रो बाकुना आणि कोमेनन्सिया यांना गोल करण्यापासून रोखण्यासाठी गॅलिंडेझने उत्कृष्ट 'डबल सेव्ह' केल्यामुळे कुरासाओ आघाडी घेण्यापासून थोडक्यात वाचले.

सामन्याच्या अंतिम टप्प्यात इक्वेडोरने सर्वस्व पणाला लावून आक्रमक खेळ केला, तरीही रूम अभेद्य राहिला. अंगुलोचा आणखी एक प्रयत्न अडवला गेला, तर अँजेलो प्रीसियाडो गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण त्याचा क्रॉस सामन्याच्या शेवटी क्रॉसबारला लागून परतला. या निकालामुळे इक्वेडोरचे विश्वचषकातील चार सामन्यांनंतरही विजयाचे खाते उघडलेले नाही आणि आता त्यांना जर्मनीविरुद्धच्या कठीण अंतिम गट सामन्याला सामोरे जावे लागणार आहे. पण कुरासाओसाठी हा सामना अनिर्णित राहणे हा आणखी एक ऐतिहासिक क्षण आहे. ज्यामुळे या कॅरिबियन देशाला विश्वचषक अंतिम स्पर्धेत पहिला गुण मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande