कर्जतमध्ये रोटरी क्लबच्या सहकार्याने अभिनव महाविद्यालयात डिजिटल लॅब सुरू
रायगड, 21 जून (हिं.स.)। अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या अभिनव ज्ञान मंदिर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने आधुनिक शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम आणि संगणक प्रयोगशाळेचे लोकार्पण शनिवारी उत्साहात केले. रोटरी क्
Digital lab launched at Abhinav College in collaboration with the Rotary Club.


Digital lab launched at Abhinav College in collaboration with the Rotary Club.


रायगड, 21 जून (हिं.स.)। अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या अभिनव ज्ञान मंदिर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने आधुनिक शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम आणि संगणक प्रयोगशाळेचे लोकार्पण शनिवारी उत्साहात केले. रोटरी क्लब बॉम्बे पवई यांच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने ही सुविधा उभारण्यात आली आहे. महाविद्यालयात पदवी शिक्षणासोबतच बी.एम.एस. (मॅनेजमेंट) अभ्यासक्रमही सुरू असून, या अत्याधुनिक प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.

कार्यक्रमाला रोटरी क्लब बॉम्बे पवईच्या अध्यक्षा रोटेरियन अंजू अहलुवालिया, प्रकल्प संचालिका रोटेरियन अमिता वोहरा, निधी समन्वयक रोटेरियन आर. वनमाली, संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य, उपाध्यक्ष अरुण धारप, सचिव नंदकुमार मनेर, सहसचिव अनिल जोशी, खजिनदार पद्माकर गांगल तसेच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

गणेश वैद्य यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रोटेरियन अंजू अहलुवालिया यांच्या हस्ते फीत कापून डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन झाले. शारदा मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संस्था गीत सादर करून कार्यक्रमात रंग भरला.

प्राचार्य प्रा. डॉ. प्रवीण घोडविंदे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली, तर अमिता वोहरा यांनी रोटरी क्लबच्या सहकार्यामागील उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात गणेश वैद्य यांनी गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande