दिवा परिसरातील ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई
ठाणे, 21 जून (हिं.स.) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊनविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 39 अनधिकृत गोडावूनवर कारवाई करण्या
Diva


ठाणे, 21 जून (हिं.स.) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊनविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 39 अनधिकृत गोडावूनवर कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशान्वये, उपायुक्त (अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन) जितेंद्र निकम, उपायुक्त (परिमंडळ-१) दीपक झिजांड तसेच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.

या मोहिमेअंतर्गत अतिक्रमण विभागामार्फत शिळफाटा येथील आचार गल्ली परिसरात असलेल्या ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निष्कासन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनना प्राधान्य देण्यात येत असून, संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोडाऊनवर कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, शासकीय, आरक्षित तसेच सरकारी भूखंडांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोडाऊनची तपासणी आणि सर्वेक्षण सुरू असून, नियमबाह्य आढळणाऱ्या गोडाऊनवर यापुढेही कठोर निष्कासनाची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande