नांदेडमध्ये पंतप्रधानांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त डॉक्टर बंधू-भगिनींसोबत विशेष संवाद बैठक
नांदेड, 21 जून (हिं.स.)। पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त विशेष महा-अभियानांतर्गत, ''अंत्योदय कार्यालय'' येथे ''श्री गुरु गोविंदसिंहजी सेवा प्रतिष्ठान'' संचलित ''गोळवलकर गुरूजी रक्तकेंद्र'' ये
Q


नांदेड, 21 जून (हिं.स.)।

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त विशेष महा-अभियानांतर्गत, 'अंत्योदय कार्यालय' येथे 'श्री गुरु गोविंदसिंहजी सेवा प्रतिष्ठान' संचलित 'गोळवलकर गुरूजी रक्तकेंद्र' येथील डॉक्टर बंधू-भगिनींसोबत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विशेष संवाद बैठक संपन्न झाली.

'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या संकल्पनेला स्मरून, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा आणि न्याय पोहोचवणे हाच आमचा ध्यास आहे. या बैठकीत विकसित भारताच्या उभारणीत डॉक्टरांचे योगदान, आरोग्यविषयक समस्या व भविष्यातील सुविधांबाबत सकारात्मक चर्चा झाली. डॉक्टर बांधवांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी व त्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

याप्रसंगी श्री अच्युत महाजन (अध्यक्ष), श्री अमरिकसिंह वासरीकर (सचिव), डॉ. संजय कदम सर, डॉ. राहुल लव्हेकर सर, डॉ. सचिन उमरेकर (नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख), डॉ. नारलावर सर आणि नांदेडमधील इतर सर्व तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. राष्ट्रहित, सेवा आणि लोककल्याणाला प्राधान्य देत विकसित भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प यावेळी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande