यशवाडी दुर्घटनेतील मृत नमिष अग्रवाल यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन
परभणी, 21 जून (हिं.स.)। मानवत तालुक्यातील यशवाडी येथे झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नमिष अग्रवाल यांच्या जिंतूर येथील निवासस्थानी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी
यशवाडी दुर्घटनेतील मृत नमिष अग्रवाल यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले सांत्वन


परभणी, 21 जून (हिं.स.)।

मानवत तालुक्यातील यशवाडी येथे झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नमिष अग्रवाल यांच्या जिंतूर येथील निवासस्थानी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी पालकमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी नमिष अग्रवाल यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. या अत्यंत वेदनादायी प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यशवाडी येथील दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande