छ. संभाजीनगरात विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)। माऊंट व्हॅली स्कूल, कानडे तात्या मैदान, रांजणगाव शेणपुंजी येथे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध योगासनांचा सराव करण्यात आला तसेच योग
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)।

माऊंट व्हॅली स्कूल, कानडे तात्या मैदान, रांजणगाव शेणपुंजी येथे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विविध योगासनांचा सराव करण्यात आला तसेच योगाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

“वसुधैव कुटुंबकम” हा भारताचा महान संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यात योगाची महत्त्वाची भूमिका आहे.

नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि जीवन अधिक संतुलित राहते. निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी योग ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“दररोज थोडा योग, आयुष्यभर उत्तम आरोग्य!”

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande