नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न!
नांदेड, 21 जून (हिं.स.)। “योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील सुंदर समन्वय आहे.” आज संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संकुलात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेच्य
अ


नांदेड, 21 जून (हिं.स.)।

“योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील सुंदर समन्वय आहे.”

आज संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संकुलात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितपणे योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संदेश दिला. छ. शिवाजी हायस्कूल आणि रा श्री छ शाहू सैनिकी विद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे याचे आयोजन करण्यात आले.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ उत्साहात संपन्न!

ही मानव आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकणारी आहे.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व योगाचे महत्त्व सांगणाऱ्या मार्गदर्शनपर सत्राने झाली. त्यानंतर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा सत्र घेण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन यांसारखी विविध योगासने सादर करून योगाविषयीची जागरूकता आणि उत्साह व्यक्त केला.

आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता ताण, अनियमित जीवनशैली आणि आरोग्यविषयक समस्या यांवर मात करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, आत्मविश्वास, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

रोगी व्यक्ती, निरोगी समाज आणि निरोगी पृथ्वी निर्माण करण्यासाठी योग हा एक प्रभावी मार्ग आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या निमित्ताने संकुलातील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प केला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande