कर्नाटकातील भक्ताकडून सिद्धरामेश्वरांच्या ऐतिहासिक ग्रंथाचे सोलापूरकरांना मोफत वाटप
सोलापूर, 21 जून (हिं.स.)। शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचे कार्य केवळ सोलापूरपुरते मर्यादित नसून त्यांनी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि संपूर्ण भारतभर समाजोपयोगी कार्य केल्याचे पुरावे देशभरातील शिलालेखांमधून आढळतात. या ऐतिहासिक माहितीवर आधारित ग्रंथ सोल
Siddeswar


सोलापूर, 21 जून (हिं.स.)। शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचे कार्य केवळ सोलापूरपुरते मर्यादित नसून त्यांनी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि संपूर्ण भारतभर समाजोपयोगी कार्य केल्याचे पुरावे देशभरातील शिलालेखांमधून आढळतात. या ऐतिहासिक माहितीवर आधारित ग्रंथ सोलापूरमध्ये नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिला जात आहे.

कर्नाटकातील धारवाड येथील रहिवासी तथा पेशाने स्त्रीरोग तज्ज्ञ असलेले डॉ. संजीव कुलकर्णी हे सिद्धरामेश्वरांचे भक्त असून त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांची सिद्धरामेश्वरांवर गाढ श्रद्धा असून, ते ‘इनस्क्रिप्शन्स फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट’ हा ग्रंथ सोलापूरकरांना विनामूल्य वितरित करत आहेत.

हा ग्रंथ इतिहास आणि पुरातत्त्व शास्त्रज्ञ तसेच कर्नाटक विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख कै. डॉ. श्रीनिवास रीत्ती आणि सोलापूरचे पुरातत्त्व अभ्यासक कै. आनंद कुंभार यांनी तयार केला आहे. या ग्रंथामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध दगडी शिलालेखांचे ठसे, त्यांचे वाचन आणि त्यातील मजकुराचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सोलापूरच्या ऐतिहासिक वारशाची माहिती अधिक व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande