
लातूर, 21 जून (हिं.स.)।
लातूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई करत ₹22 हजारांचा दंड वसूल केला. महापौर जयश्री सोनकांबळे आणि आयुक्त मानसी मीना यांच्या निर्देशानुसार गंजगोलाई परिसरात ही मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईदरम्यान सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या 4 आस्थापनांवर ₹20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या एका नागरिकाकडून ₹500 दंड वसूल करण्यात आला.
कारवाईवेळी प्रमुख स्वच्छता निरीक्षक अक्रम शेख, शिवराज शिंदे, महादेव फिस्के, प्रदीप गायकवाड, रवि शेंडगे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेने नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis