
छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)। राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत दिनांक 21 जून 2026 रोजी आयोजित नीट (यूजी) पुनर्परीक्षा करीता छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली.
शहरातील 47 परीक्षा केंद्रांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला , ड्रोनद्वारे निगराणी, संशयित ठिकाणांवर गुप्त नजर तसेच आवश्यक वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis