लातूर - मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
लातूर, 21 जून (हिं.स.)। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन पानगाव तालुका रेनापुर या ठिकाणी करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात मनसे प्रदेश सर
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा


लातूर, 21 जून (हिं.स.)। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन पानगाव तालुका रेनापुर या ठिकाणी करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात मनसे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे व मनसे जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुनील नागरगोजे यांच्या वतीने शेतकरी व शेतमजूर नवविवाहित दांपत्यांना सर्व संसार उपयोगी साहित्य देऊन त्यांचे विवाह लावून देण्यात आले.

यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाने, मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, पंचायत समिती सभापती मोनिका सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचूड चव्हाण, मनसे महिला प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती रेखाताई नागराळे,मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी, विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष किरणजी चव्हाण,मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रेणापूर वाहिद शेख, पानगाव माजी सरपंच सुकेश भंडारे, मनसे रोजगार स्वयंरोजगार सेना प्रदेश उपाध्यक्ष सचिन सिरसाट,मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अजित घंटेवाड, मनसे लातूर शहराध्यक्ष मनोज अभंगे, मनसे देवणी तालुकाध्यक्ष सोमनाथ कलशेट्टी, परळी मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, मनसे महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई केंद्रे,नरसिंग भताने,मनसे शहर सचिव सरफराज सय्यद, जहांगीर शेख,कोष्टगाव सरपंच सुंदर घुले,बागझरी सरपंच प्रशांत दहिफळे,अनामे मामा,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आरडले,बाबा हलकुडे सर,धवेली सरपंच प्रल्हाद पोटे, धवेली चेअरमन महादू चंबुले, मुसळेवाडी सरपंच सुधीर कुंटेवाड, उपसरपंच बिभीषण जाधव,बापू नरारे, आसराचीवाडी माजी सरपंच गोविंद नागरगोजे,पत्रकार अनिल फुलारी, विष्णू आचार्य, नीलकंठ चव्हाण, संतोष तुरूप,बाबुराव नागरगोजे, संतोष कोते, जगन्नाथ राजुरे, दत्ता कस्तुरे,भूषण संपत्ते गंगाधर मुंढे,धर्मराज मोटाडे, उत्तरेश्वर हलकुडे, प्रकाश आबा केदार, विलास नागरगोजे, प्रभाकर खलंग्रे, गोविंद माने, नरसिंग मुरकुटे, संपत मुंडे, श्रीनिवास लहाने, हनुमंत आप्पा इंगोले, हमीद चाचा शेख, नाना जाधव,आदी प्रमुख नागरिक उपस्थित होते.

हा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी, इम्रान मनियार,चेतन चौहान,सुरेश गालफाडे, प्रमोद आंबेकर, धनराज शिरसाट, बालाजी हनवते, शिवराज शिरसाट, संभाजी शिरसाट, राहुल चिताडे, भरत होळंबे, प्रसाद सूर्यवंशी,, बापू कांदे, भूषण आचार्य,शहेनशहा सय्यद,उत्तरेश्वर पांचाळ,राम नागरगोजे,गट्टू शेख,श्री स्वामी,हनुमंत लहाने, रंगनाथ कुसंगे, वामन मोरे, लिंबराज जाधव, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी ह. भ. प. प्रभाकर महाराज गिरी, व व्यंकटी महाराज यांनी नवदांपत्यास शुभेच्छा पर आशीर्वाद दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande