उजनी कालव्यात २० हजार लिटर भेसळयुक्त दूध फेकल्याचा धक्कादायक प्रकार
सोलापूर, 21 जून (हिं.स.)पंढरपूर तालुक्यातील सुपली परिसरात उजनीच्या उजव्या कालव्यात सुमारे २० हजार लिटर भेसळयुक्त दूध अज्ञातांकडून सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत
Milk


सोलापूर, 21 जून (हिं.स.)पंढरपूर तालुक्यातील सुपली परिसरात उजनीच्या उजव्या कालव्यात सुमारे २० हजार लिटर भेसळयुक्त दूध अज्ञातांकडून सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

कालव्यात मोठ्या प्रमाणावर दूध साचल्याने ग्रामस्थांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीमुळे संबंधितांनी भेसळयुक्त दूध कालव्यात टाकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर दूध भेसळ प्रकरणांविरोधात कठोर मोहीम सुरू केल्यानंतर भेसळ करणाऱ्या घटकांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात दूध भेसळीचे प्रकार अजूनही सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande