सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून १९.६७ लाखांचा अपहार; आरोपी जेरबंद
रायगड, 21 जून (हिं.स.)। भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल १९ लाख ६७ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोलाड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून नोकरीच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आ
Misappropriation of ₹19.67 lakh after gaining trust; accused arrested.


रायगड, 21 जून (हिं.स.)। भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल १९ लाख ६७ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोलाड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून नोकरीच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे कोलाड येथील आंबेवाडी गावातील फिर्यादी आणि अन्य व्यक्तींना आरोपीने भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्याने त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी ऑनलाइन व्यवहार, धनादेश आणि रोख स्वरूपात एकूण १९ लाख ६७ हजार ५०० रुपये स्वीकारले.

मात्र पैसे स्वीकारल्यानंतर आरोपीने संबंधितांना कोणत्याही प्रकारची नोकरी मिळवून दिली नाही. तसेच त्यांच्याशी संपर्क टाळण्यास सुरुवात केली. फोन कॉल्सना प्रतिसाद न देणे आणि उडवाउडवीची उत्तरे देणे अशा प्रकारे त्याने फिर्यादींची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीला २० जून २०२६ रोजी रात्री अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाडीक करीत आहेत. आरोपीकडून आणखी काही फसवणुकीची प्रकरणे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande