पेपरफुटीच्या सावटाखाली NEET; लातूरमध्ये प्रश्नपत्रिकांची कडेकोट सुरक्षा
लातूर, 21 जून (हिं.स.)। NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या परीक्षेसाठी प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू केली. त्याअंतर्गत लातूर येथील परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका कडेकोट पोलीस बंदोबस्तात
नीट परीक्षा


लातूर, 21 जून (हिं.स.)। NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या परीक्षेसाठी प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू केली. त्याअंतर्गत लातूर येथील परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका कडेकोट पोलीस बंदोबस्तात दाखल करण्यात आल्या.

प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीपासून ते परीक्षा केंद्रांवरील साठवणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पोलीस, महसूल प्रशासन आणि परीक्षा अधिकाऱ्यांची संयुक्त देखरेख ठेवण्यात आली. प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचताच त्यांची सीलबंद स्वरूपात तपासणी करण्यात आली. केंद्र परिसरात सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखरेख ठेवण्यात आली असून अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

पेपरफुटीच्या आरोपांनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच परीक्षार्थ्यांची ओळख पडताळणी, प्रवेशद्वारांवर तपासणी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, लातूरसह राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम घेण्यात आली होती. प्रशासनाने परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande