पुण्यात हलक्या पावसाच्या सरी; उकाड्याने त्रस्त पुणेकरांना दिलासा
पुणे, 21 जून (हिं.स.)। शहराच्या मध्यवर्ती भागात रविवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. जरी पाऊस अल्पकाळासाठी झाला असला, तरी वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Rain

जून महिन्याचे तीन आठवडे पूर्ण होत आले तरी पुण्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे वाढलेल्या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः दुपारच्या वेळी रस्त्यांवर उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत होता.

दरम्यान, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पुन्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारपासून मुंबई आणि ठाणे परिसरासाठी मेघगर्जनेसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच, सोमवारपासून पुणे शहर आणि परिसरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, पुढील काही दिवसांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

 rajesh pande