पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी
पुणे, 21 जून (हिं.स.) निरोगी वृद्धत्वासाठी योग'' या संकल्पनेवर आधारित पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध योग संस्था तसेच संघटना यांच्या सहकार्याने सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजि
dgfhhdrt


पुणे, 21 जून (हिं.स.) निरोगी वृद्धत्वासाठी योग' या संकल्पनेवर आधारित पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध योग संस्था तसेच संघटना यांच्या सहकार्याने सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सुमारे ५ हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी खासदार प्रा.मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासणे, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपायुक्त माधव जगताप, डॉ. संतोष टेंगले, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. कुलकर्णी यांनी, नागरिकांनी योगा केल्यामुळे आरोग्य सदृढ राहते, मन प्रसन्न राहते, जीवनात सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहन मिळते, त्यामुळे नागरिकांनी दररोज योगा करावे असे आवाहन त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande