अमरावती विधान परिषद मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
अमरावती, 21 जून (हिं.स.) | अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ जून रोजी शांततेत मतदान पार पडले असून आता उद्या २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीची जबाबदारी दोन उपजि
मतमोजणीची जबाबदारी एसडीओ, तहसीलदारांच्या खांद्यावर


अमरावती, 21 जून (हिं.स.) | अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ जून रोजी शांततेत मतदान पार पडले असून आता उद्या २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीची जबाबदारी दोन उपजिल्हाधिकारी (एसडीओ) व दोन तहसीलदार व दोन नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या दोन बँकेतील दोन

अधिकाऱ्यांची सुक्ष्म निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीत एकूण ४५१ मतदारांपैकी ४२७ मतदारांनी मतदानाचा हक्क सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदानानंतर सर्व मतपेट्या नियोजन भवन येथील स्ट्रॉगरूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत. २२ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून ती दोन टेबलवर केली जाणार आहे. प्रत्येक टेबलवर एक उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक नायब तहसीलदार तसेच एक सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एका टेबलवर चार अधिकारी तर दोन्ही टेबलांसाठी एकूण आठ अधिकारी कार्यरत राहणार आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीला च्या जाणार पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होईल. या प्राथमिक प्रक्रियेस सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होऊन सुमारे अर्धा ते पाऊण तासात ती पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या मतदारसंघातील विजयी उमेदवार पहिल्याच फेरीत निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande