शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची उपस्थिती
रायगड, 21 जून (हिं.स.)। : मैत्रीबोध परिवाराच्या वतीने शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी, मानसिक शांततेसाठी आणि आंतरिक परिवर्तनासाठी आयोजित क
**शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा**  कर्जत : मैत्रीबोध परिवाराच्या वतीने शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी, मानसिक शांततेसाठी आणि आंतरिक परिवर्तनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत तसेच आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती होय. यावेळी योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान सत्रांद्वारे उपस्थितांना निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.  मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी योग हा भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. योगाचा दैनंदिन जीवनात अंगीकार केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारतेच, शिवाय भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासही मदत होते, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी मैत्रीबोध परिवाराच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.  कार्यक्रमादरम्यान मैत्रीबोध परिवाराचे संस्थापक व मार्गदर्शक मैत्रेय दादाश्रीजी यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. ‘मैत्री’ आणि ‘संस्कृती’ या मूल्यांच्या आधारे भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनविण्याचा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.  योग दिन हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आंतरिक शक्तीशी जोडणारा आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा मार्ग आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या सोहळ्यामुळे उपस्थितांना मानसिक शांतता, कौटुंबिक सुसंवाद आणि शारीरिक आरोग्याचा सकारात्मक अनुभव मिळाला. योगाच्या माध्यमातून निरोगी समाज आणि सक्षम भारत घडविण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

रायगड, 21 जून (हिं.स.)। : मैत्रीबोध परिवाराच्या वतीने शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी, मानसिक शांततेसाठी आणि आंतरिक परिवर्तनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत तसेच आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती होय. यावेळी योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान सत्रांद्वारे उपस्थितांना निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी योग हा भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. योगाचा दैनंदिन जीवनात अंगीकार केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारतेच, शिवाय भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासही मदत होते, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी मैत्रीबोध परिवाराच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान मैत्रीबोध परिवाराचे संस्थापक व मार्गदर्शक मैत्रेय दादाश्रीजी यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. ‘मैत्री’ आणि ‘संस्कृती’ या मूल्यांच्या आधारे भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनविण्याचा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

योग दिन हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आंतरिक शक्तीशी जोडणारा आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा मार्ग आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या सोहळ्यामुळे उपस्थितांना मानसिक शांतता, कौटुंबिक सुसंवाद आणि शारीरिक आरोग्याचा सकारात्मक अनुभव मिळाला. योगाच्या माध्यमातून निरोगी समाज आणि सक्षम भारत घडविण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande