मोहरमच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव पोलिसांचा रूट मार्च
छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पोलिसांनी खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत आगामी मोहरमच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला आहे. नागरिकांनी या काळामध्ये शांतता राखावी असे आवाहन देखील पोलिसांनी के
मोहरमच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव पोलिसांचा रूट मार्च


छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पोलिसांनी खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत आगामी

मोहरमच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला आहे. नागरिकांनी या काळामध्ये शांतता राखावी असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी सोयगाव शहरात आज सोयगाव पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्च काढत नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. सोयगाव पोलिस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून, सर्वांनी शांतता व सामाजिक ऐक्य कायम ठेवावे असे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande