लातूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी केली नीट युजी परीक्षा केंद्राची पाहणी
लातूर, 21 जून (हिं.स.)। जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी केली शहरातील नीट युजी परीक्षा केंद्राची पाहणी लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर शहरातील नीट युजी परीक्षा केंद्रांची पाहणी केली.
नीट परीक्षा


लातूर, 21 जून (हिं.स.)।

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी केली शहरातील नीट युजी परीक्षा केंद्राची पाहणी

लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर शहरातील नीट युजी परीक्षा केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शहरातील दयानंद महाविद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय, कॉक्सिट महाविद्यालय आणि जयक्रांती महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रांना भेट दिली.

लातूर जिल्ह्यातील 26 परीक्षा केंद्रावर आज नीट युजी 2026 परीक्षा होत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी केली असून सर्व परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande