अमरावती - कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रश्न पत्रिका पोहचली केंद्रावर
अमरावती, 21 जून, (हिं.स.)। वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आज रविवारी (ता. २१ जून) होणारी परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैर प्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी न
कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रश्न पत्रिका पोहचली केंद्रावर


अमरावती, 21 जून, (हिं.स.)। वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आज रविवारी (ता. २१ जून) होणारी परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैर प्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शहरातील १४ परीक्षा केंद्रांवर सुमारे ४ हजार ८४४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पेपर फुटीप्रकरणानंतर शासन आणि प्रशासन जागे झाले आहे. परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नीट परीक्षेच्या संवेदनशीलतेचा विचार करून प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे अमरावतीत आणलेल्या प्रश्नपत्रिका जिल्हा कोषागार, स्टेट बँक ऑफ इंडिया येथे स्ट्रांग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. आज परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका कडक पोलीस बंदोबस्तात कॅश व्हॅनद्वारे त्या संबंधित केंद्रांपर्यंत आज सकाळी पोहचविण्यात आल्यात शहरातील 14 केंद्रांवर नीट ची पुनरपरिक्षा घेण्यात येत आहे.

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन प्रत्येक केंद्रावर डॉक्टर आणि दोन आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षा कालावधीत वीजपुरवठा खंडित होऊ नये. म्हणून प्रत्येक केंद्रावर कनिष्ठ अभियंता आणि विद्युत सहाय्यक तैनात करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande