
सोलापूर, 21 जून (हिं.स.)। प्रभाग क्र. १ मध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीशैल नगर येथे आयोजित सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विश्वास, विकास आणि जनकल्याणाच्या १२ वर्षांच्या पूर्ततेच्या पार्श्वभूमीवर तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
निरोगी भारत आणि सशक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने झालेल्या या कार्यक्रमात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैली विकसित होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमास नगरसेविका राजश्री कणके, पूनम काशिद, नगरसेवक अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेला अनुसरून योगाचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड