पंढरपूर मंदिरातील लेपन प्रक्रियेवरील स्थगिती अर्ज न्यायालयाने नाकारला
सोलापूर, 21 जून (हिं.स.)। श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणाऱ्या लेपन प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका भीमाचार्य बाळाचार्य वरखेडकर
Vithal


सोलापूर, 21 जून (हिं.स.)। श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणाऱ्या लेपन प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका भीमाचार्य बाळाचार्य वरखेडकर यांनी दाखल केली होती.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने स्थगिती अर्ज नामंजूर केला. दरम्यान, मंदिर महासंघाचे गणेश लंके यांनी दाखल केलेल्या स्वतंत्र अर्जावर रविवारी (२२ जून) न्यायालय निर्णय देणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मंदिर समितीनुसार स्वयंभू विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज होत असल्याने त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा सल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाने दिला आहे. त्यानुसार २२ ते २४ जून या कालावधीत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्तींवर लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामासाठी २२ आणि २३ जून या दोन दिवसांत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असून, संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित दर्शन व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande