
जालना , 21 जून (हिं.स.)। जाफराबाद येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांची यावेळी उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य हीच खरी धनसंपदा – करा योग, रहा निरोगी हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. योगामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळते, मन प्रसन्न राहते आणि शरीर सुदृढ बनते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक नागरिक, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच योगशिक्षक रवी गावंडे, एकनाथराव घाडगे आणि साहेबराव मोरे यांनीही आवर्जून उपस्थित राहून योगाचे महत्त्व आणि विविध योगासने याविषयी मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis