
कोल्हापूर, 22 जून (हिं.स.)। पिरवाडी येथे हातभट्टी दारू विक्री करणारी बेबी रवी मछले ही संशयित महिला विनापरवाना अवैधपणे देशी व विदेशी दारू विक्री करताना मिळून आल्याने या महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या महिलेवर अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 11 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या निर्देशानुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, करवीर पोलीस ठाण्याचे अंमलदार, अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने पिरवाडी गावातील बेबी रवी मछले या महिलेवर सन 2025 पासून ते आज अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 11 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
गावठी हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व ग्रामपंचायातींनी ग्रामरक्षक दलाची स्थापना करावी तसेच अवैध गावठी हातभट्टी दारूची विक्री, निर्मिती किंवा वाहतूक याची माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र.18002339999 या क्रमांकावर किंवा व्हॉट्सॲप क्र. 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar