रायगड : माणगावच्या बामणोली येथे भाजप पक्षप्रवेश सोहळा
रायगड, 22 जून (हिं.स.) । माणगाव तालुक्यातील साई पंचायत समिती गणातील बामणोली गावात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रातील नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिम
BJP flag hoisted in Bamnoli; villagers publicly join the party.


BJP flag hoisted in Bamnoli; villagers publicly join the party.


रायगड, 22 जून (हिं.स.) । माणगाव तालुक्यातील साई पंचायत समिती गणातील बामणोली गावात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रातील नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केल्याचे नव्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश ठोरे यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी मतदारसंघात संघटन बळकटीकरण आणि पक्षप्रवेश मोहिम सुरू ठेवली असून त्याचाच एक भाग म्हणून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष परेश सांगळे , तालुका सरचिटणीस बाबुराव चव्हाण महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपाली कसारे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रचना ठोरे आणि युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश खडतर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केला. साधू शिंदे, महेंद्र पवार, विठोबा पवार, हरी पवार, राजेश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेत पक्षप्रवेश केला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत केंद्र व राज्य सरकारच्या योजना गावागावांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे बामणोली व साई गण परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande