योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून सर्वांगीण साधना - रजनीश कर्नाटक
* बँक ऑफ इंडियातर्फे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा मुंबई, २२ जून (हिं.स.) : योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून ती एक सर्वांगीण साधना आहे, जी मानसिक स्पष्टता, शारीरिक बळ आणि आध्यात्मिक विकासाला चालना देते. योगाच्या परिवर्तनशील शक्तीचा अनुभव घेण्
बॅंक ऑफ इंडिया


बॅंक ऑफ इंडिया


* बँक ऑफ इंडियातर्फे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

मुंबई, २२ जून (हिं.स.) : योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून ती एक सर्वांगीण साधना आहे, जी मानसिक स्पष्टता, शारीरिक बळ आणि आध्यात्मिक विकासाला चालना देते. योगाच्या परिवर्तनशील शक्तीचा अनुभव घेण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांनी केले.

बँक ऑफ इंडियाने २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस (IDY) अत्यंत उत्साहात साजरा केला. 'निरोगी वार्धक्यासाठी योग' (Yoga for healthy ageing) या संकल्पनेवर आधारित आणि सरकारच्या 'सामायिक योग प्रोटोकॉल' (CYP) नुसार, देशभरातील सर्व विभागीय कार्यालये आणि परदेशातील केंद्रांवर सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यात बँकेचे कर्मचारी आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मुंबईतील बीकेसी (BKC) येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमाचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) श्री. रजनीश कर्नाटक यांनी केले.

पुढे बोलताना रजनीश कर्नाटक यांनी मत व्यक्त केले की, योग ही प्राचीन भारतीय परंपरा आता सीमा ओलांडून एक जागतिक चळवळ बनली आहे. योगाचे महत्त्व केवळ शारीरिक आसने आणि व्यायामापुरते मर्यादित नसून, आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर होणाऱ्या सखोल परिणामांमध्येही ते दडलेले आहे.

सर्व सहभागींना योग ही आपली जीवनशैली बनवण्याचे आणि त्याचे महत्त्व आपल्या कुटुंबियांना, मित्र-मैत्रिणींना, सहकाऱ्यांना व ग्राहकांना पटवून देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात कार्यकारी संचालक, मुख्य दक्षता अधिकारी, मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक आणि कर्मचारी वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवला. मुख्य कार्यालयातील योग प्रात्यक्षिके मुंबईतील प्रसिद्ध योग शिक्षिका श्रीमती कांचन भोसले यांनी घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande