आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सरदार पटेल महाविद्यालयात योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
चंद्रपूर, 22 जून (हिं.स.)।येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग (मुले व मुली) तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सरदार पटेल महाविद्यालयात योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न


चंद्रपूर, 22 जून (हिं.स.)।येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग (मुले व मुली) तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी स्व. वामनराव गड्डमवार सभागृह येथे योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते, तर प्रमुख योग प्रशिक्षक म्हणून चंद्रपूर पतंजली महिला योग समितीच्या रेणुका साठवणे व कविता यलपूरवार उपस्थित होत्या. यावेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, एनसीसी प्रमुख कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके, एनएसएस प्रमुख डॉ. उषा खंडाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. विक्की पेटकर, प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थी, स्वयंसेवक, कॅडेट्स आणि खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. योगाचे महत्त्व जनमानसात रुजविणे आणि निरोगी समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande