
नांदेड, 22 जून (हिं.स.)। विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत सर्वत्र महायुतीची विजयी घोडदौड दिसून येते आहे. असे मत माजी मुख्यमंत्री सभ भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे . विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आपली प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात सुद्धा भाजप महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. महायुतीच्या राज्यातील सर्वच विजयी उमेदवारांचेही मी अभिनंदन करतो.
महायुतीच्या या विजयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन तसेच महायुतीचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. महायुतीच्या या विजयासाठी सर्वांचेच अभिनंदन व आभार.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis