महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शाहरुख देसाईच्या बडतर्फीची महावितरणकडे मागणी
कोल्हापूर, 22 जून (हिं.स.)। शिरोली गावातील शाहरुख देसाई याने महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचेवर लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ बनवले. हाच शाहरुख देसाई महावितरण कंपनीमध्ये नोकरीत असल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक हो
मागणीचे निवेदन देताना शिरोली ग्रामस्थ


कोल्हापूर, 22 जून (हिं.स.)। शिरोली गावातील शाहरुख देसाई याने महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचेवर लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ बनवले. हाच शाहरुख देसाई महावितरण कंपनीमध्ये नोकरीत असल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक होऊन तो दीर्घकाळापासून न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला महावितरण च्या सेवेतून बडतर्फ करावे. अशा मागणीचे निवेदन शिरोली ग्रामस्थ, विविध हिंदुत्ववादी संघटना, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महावितरण प्रशासनाला देण्यात आले.

या निवेदनामध्ये आरोपी शाहरुख देसाई यास सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, तसेच त्याचे महावितरणशी असलेले सर्व शासकीय संबंध तत्काळ समाप्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या व्यक्तीला शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कायम ठेवणे हे समाजामध्ये चुकीचा संदेश देणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच महावितरण प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कायद्यावरील विश्वास कायम ठेवत प्रशासनाने न्याय्य व कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

निवेदनावर जि. प. सदस्य सलीम महात, उप सरपंच विजय जाधव सरपंचपद्मजा करपे यांचेमार्फत पिंटू उर्फ कृष्णात करपे, पं. स. सदस्य कमल कौंदाडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सतिश पाटील, प्रशांत कागले आदींच्या सह्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande