नांदूरघाट येथे ८ रस्ते कागदावर, १ कोटींचा केला अपहार
बीड, 22 जून (हिं.स.)। नांदूरघाट ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामात ८ रस्ते कागदावरच दाखवत १ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जि. प. चे सीईओ जितीन रहमान यांनी तांत्रिक सहायक रवींद्र दराडे व ग्राम रोजगार सेवक सादेक शेख या दोघांना बडतर्फ के
नांदूरघाट येथे ८ रस्ते कागदावर, १ कोटींचा केला अपहार


बीड, 22 जून (हिं.स.)।

नांदूरघाट ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामात ८ रस्ते कागदावरच दाखवत १ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जि. प. चे सीईओ जितीन रहमान यांनी तांत्रिक सहायक रवींद्र दराडे व ग्राम रोजगार सेवक सादेक शेख या दोघांना बडतर्फ केले असून, ग्रामसेवक भगवान सिरसट व शाखा अभियंत्या व्ही. एम. सासवडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे. सरपंच सुनीता युवराज जाधव यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवला आहे. केजचे बीडीओ विठ्ठल नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केल्यांनतर समितीने नांदूरघाटला केलेल्या चौकशीत ८ रस्ते बोगसपणे करून ५९ लाख रुपयांचा निधी उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande