उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांचे नेतृत्व यशस्वी
नाशिक, 22 जून (हिं.स.)। - स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या मतदारसंघांमध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते निवडून आले असले तरी या विजयामध्ये काही अंशी राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश असल्याने गिरीश महाजन यांनी नाशिक व
Girish Mahajan's leadership


नाशिक, 22 जून (हिं.स.)।

- स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या मतदारसंघांमध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते निवडून आले असले तरी या विजयामध्ये काही अंशी राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश असल्याने गिरीश महाजन यांनी नाशिक व जळगावची जागा जिंकून पक्षाला मोठी ताकद दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये नाशिक आणि जळगाव या दोन्हीही मतदारसंघांमध्ये भाजपचे संकटमोचक कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची मोठी जबाबदारी होती संपूर्ण राज्याचे या दोन्हीही मतदारसंघाकडे लक्ष लागलेले होते त्यामुळे या मतदारसंघात कोण निवडून येतं भाजपा आपली जागा मारेल की पराभव होईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते या दोन्हीही मतदारसंघाची जबाबदारी ही संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे होती पण हेही संकट गिरीश महाजन यांनी पार करून पक्षाला मोठी ताकद दिली आहे.

नाशिक विधान परिषदेच्या या जागेसाठी आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचा दावा होता त्यानंतर शिवसेना फुटली आणि शिंदे सेनेने आपल्या दावा सांगितला महायुती नसल्यामुळे शिंदे सेना या पक्षावर ती निवडणुकीची जबाबदारी दिली परंतु एकंदरीत असलेली परिस्थिती बघता शिंदेला यश आले नाही पण ही जागा भाजपाचे निष्ठावंत असलेले गणेश गीते यांचे भाऊ आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते यांनी निवडून घेऊन मोठा दावा पक्षाचा या जागेवर केला आहे भविष्यात या जागेवर आता भाजप आपला दावा कायम सांगेल यात कुठलीही शंका नाही पण हे सर्व करत असताना पडद्या पाठीमागे गिरीश महाजन यांची भूमिका महत्त्वाची राहिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande